आंब्याचे लोणचे

आंब्याचे लोणचे बनवण्यसाठी  लागणारी सामग्री:

कच्चा आंबा - 100 ग्रॅम

मेथी - 1/4 चमचे

जिरे - 3 चमचे

मोहरी - 8 चमचे

हिंग - १/4 चमचा

हळद - १/२ चमचा

तेल - 50 ग्रॅम

कोरडी मिरची - 21-26

मीठ - चवीनुसार 


आंब्याचे लोणचे कशा पद्दतीने बनवावे :

प्रथम आंबे चांगल्या पद्दतीने धुवावे आणि धुवून झाल्यानंतर त्याचे छोटे छोटे तुकडे करून एका ताटलीमध्ये ठेवावे. आंब्याचे जास्त मोठे तुकडे करू नये. आता गॅस वरती तवा ठेवावा आणि त्यामध्ये पाणी टाकावे. अजून त्यामध्ये मीठ टाकावे आणि पाण्याला हलक्या पद्दतीने गरम होऊ द्या. समजा आंबा जास्त आंबट नसल्यास पाण्यामध्ये मीठ कमी टाकावे.

थोड्यावेळाने पाणी जर गरम झाल्यानंतर त्यामध्ये आंब्याचे तुकडे टाकावे आणि अर्धा तास त्यावरती झाकण ठेवावे. आता मसाला तयार करूया. यासाठी गॅस बारिक करून त्यावर भांड ठेवावे आणि त्यात जिरे आणि मेथीचे दाणे तळून घ्यावे.तळून झाल्यानंतर जिरे आणि मेथी एका दुसऱ्या भांडयांमध्ये काढावी आणि त्याच भांड्यामध्ये राई टाकावी आणि हिंग टाकून पुन्हा चांगले तळून घ्यावे. राई आणि हिंग चांगले तळून झाल्यानंतर सर्व मसाला मिक्सर मध्ये टाकावा आणि वरून थोडी हळद पावडर टाकावी आणि बारीक करून घ्या. ते बारीक केलेले सर्व मिश्रण एका दुसऱ्या भांड्यात काढावे. त्यानंतर भांड्यामध्ये गॅस बारीक करून तूप टाकावे. नंतर तिखट मिरची आणि लाल मिरची टाकून चांगले भाजून घ्या. भाजून घेतलेली तिखट आणि लाल मिरची मिक्सर मध्ये टाकून त्याची पावडर बनून घ्यावी. 

आता सगळ्या मसाल्याना एकत्र करून आंब्याच्या तुकड्यामध्ये टाकावे आणि बऱ्यांपॆकी मिसळून घ्यावे. त्यानंतर २ ते ३ तास सोडून द्यावे, तरच ते चांगल्या प्रकारे मिक्स होईल. आता एका मोठया भांड्यामध्ये हे मिश्रण भरून ४ ते ५ दिवस चांगलं उन्हामध्ये ठेवून द्यावे. ४ ते ५ दिवसानंतर आंब्याचं लोणचे तयार होईल आणि त्याला चव सुद्धा चांगली येईल. ह्या लोणच्याला तेलामध्ये डुबवून ठेवावे. त्यामुळे फायदा असा होतो की,लोणचं ६ ते ७ महिने खराब होत नाही. लोणच एकदम स्वादिष्ट आणि त्याचा रंग बघून तुमच्या तोंडालाही पाणी सुटेल. आता तुमचे आंब्याचे लोणचे तयार झाले, आता ते तुम्ही जेवणाबरोबर खाऊ शकतात त्यामुळे तुम्हाला अजून खूप मज्जा येईल. 

                                                                                                                 सागर भालेकर.

Comments

Popular posts from this blog

लिंबूचे फायदे

कोरोना विषाणू नागरिकांनी घरांमध्ये राहून कशा पद्दतीने सावधान राहिले पाहिजे.