लिंबूचे फायदे

 लिंबू हा व्हिटॅमिन C चा घटक आहे. लोक लिंबूचा वापर करून खूप पदार्थ बनवतात. लिंबूचा वापर चटणी आणि लोणचं बनवण्यात खूप उपयोगी ठरतो. लिंबूचा वापर आपण रोग हटवण्यासाठी सुद्धा करू शकतो.

आयुर्वेदामध्ये लिंबू बद्दल खूप चांगल्या गोष्टी सांगितल्या आहेत. लिंबू हा प्रत्येक रोगावर गुणकारी आहे. पतंजली नुसार, लिंबूचा उपयोग पोटामधील किडे मारण्यासाठी सुद्धा होतो, तसेच पोटामध्ये दुखत असल्यास आराम मिळावा म्हणून लिंबूचे पाणी पिल्याने पोटाला खूप आराम मिळतो. विशेष म्हणजे पित्त साठी तर लिंबू खूप गुणकारी आहे. 

प्रथम जाणून घेऊ लिंबू म्हणजे काय?

लिंबूच्या खूप जाती आढळून येतात,विशेष लिंबूच्या साली वरून सुद्धा त्याचे भरपूर प्रकार आहेत. उदाहरण : कागदी लिंबू आणि ईडलिंबू असे दोन प्रकार आढळून येतात. कागदी लिंबू हे भारतीयांच्या अन्‍नात रोजच्या वापरात असलेले एक आंबट चवीचे फळ आहे. हे फळ कच्चे असताना हिरवे व पिकल्यावर पिवळ्या रंगाचे होते.  कागदी लिंबाचे अनेक उपयोग आहेत. याचे सरबत, लोणचे इत्यादी करतात. लिंबू हे फळ आहे. कागदी लिंबूचा औषधांमध्ये प्रयोग म्हणून उपयोग होतो. ह्याचा आकार छोटा आणि मध्यम असतो. कागदी लिंबूचे फूल छोटे, सफेद किंवा गुलाबी रंगाचे असतात, ह्या फुलांना खूप सुगंध असतो.

लिंबाच्या झाडाला लिंब किंवा निंब म्हणतात. हे झुडुप असते. पान जेथे देठाला चिकटते, तेथे एक लहानसा पंख असतो. देठाला लहान काटे असतात. पानाच्या बेचक्यात फूल आणि फळ येते. लिंबाचे सालीवरून अनेक प्रकार होतात, ते असे. जाड साल, पातळ साल, पिवळी साल, हिरवी साल, सपक साल आणि खरखरीत साल. बगदाद येथे दुप्पट आकाराची आणि तांबूस फळे देणारा एक प्रकार आहे. सिसिली बेटात लिंबाचे अमाप पीक येते अमेरिका आणि इंग्लंड या देशांत सिसिलीची लिंबे जातात.

लिंबाच्या अनेक जाती आहेत, महाळुंग, ईडलिंबू, जंबीर, कागदी लिंबू, वगैरे.

  • English – बीटर ऑरेंज (Bitter orange), बीगेरेड ऑरेंज (Bigarade orange), Seville orange (सेवील्ले ऑरेंज), लाइम (Lime), सॉर ऑरेंज (Sour orange)
  • Hindi (lemon in hindi)- खट्टा नींबू, कागजी नींबू (kagzi nimbu)
  • Sanskrit – बृहत् जम्बीर, निम्बुक
  • Urdu – लिमू (Limu)
  • Kannada – बीजपूर (Bijpur)
  • Tamil – चामपलम (Champalam)
  • Telugu – बीजपूरम (Beejpuram)
  • Bengali – लेबू (Lebu)
  • Nepali – बिमिरो (Bimiro
  • Manipuri – चाम्प्रा (Champra)
  • Marathi – अंबटनिंबू(Ambatanimbu), लिंबू (Limbu)
  • Arabic – लीबू (Leebu)
  • Persian – लीबू (Leebu)

लिंबूचे फायदे

१. लठ्ठपणा कमी करण्यासाठी :- दररोज सकाळी उपाशी पोटी गरम पाण्याबरोबर लिंबू सेवन केल्यास अतिरिक्त चरबी कमी होते.

२. पित्त झाल्यास रोज लिंबाचे सरबत घेतल्यास भूक वाढते. अन्न पचते व शौचास साफ होते.

३.वाळलेले लिंबू मधात घालून चाटण म्हणून घेतल्यास उचकी तसेच ओकारी थांबण्यास मदत होते. अंगाला कंड सुटत असल्यास लिंबाचा रस खोबरेल तेलात मिसळून अंगास चोळतात. व गरम पाण्याने स्नान करतात. कंड कमी होते..

४.नायटे व डोक्यातील खवडे यावरही लिंबाचा रस चोळल्याने चांगला परिणाम होतो.

५. सुंदर केसांसाठी लिंबू :

जर डोक्यावरचे केस किंवा टाळूवरची त्वचा तेलकट असेल तर त्यावर लिंबू लावतात. जास्त प्रमाणात लावल्यास केस ब्लीच होतात.. मात्र थोडासा लिंबाचा रस हाताने केसांच्या मुळास लावणे योग्य असेल. रोजचा किंवा सतत लिंबाचा उपयोग केसांवर म करता फक्त गरजेनुसार करतात. मरगळलेल्या केसांना लिंबाचा रस चमक आणि तजेलदार बनवतात. कृत्रिम उत्पादनांचा वापर न करता केस सुंदर आणि सुगंधी होतात. गरमीच्या दिवसात घामाने आणि धुळीने केस मळतात, त्यामुळे लोक केस वारंवार धुतात. लिंबाचा योग्य प्रमाणातला वापर केसांना चमकदार व गुळगुळीत बनवतो. अतिवापराने केस कोरडे होऊ शकतात.

६. रक्तस्त्राव झाल्यास लिंबूचा खूप उपयोग होतो. १ कप गरम दुधामध्ये लिंबू पिळल्यास रक्तस्त्राव तुरंत बंद होतो. हा प्रकार दुसऱ्यांदा करू नये.

जास्त तहान लागल्यास लिंबूचा खूप लाभ होतो.

जास्त तहान लागल्यास तुम्ही पाण्यामध्ये लिंबू टाकून सरबत करून पियू शकतात. 

चामड्याच्या रोगावरती लिंबू खूप लाभकारी आहे.

खाज किंवा चामडीवर काळे डाग असल्यलास लिंबू लावल्यास लाभ होतो.

लिंबू पाणी पिल्याने अंगावरील त्वचा चे रोग ठीक होतात.

लिंबाचे अनेक औषधी उपयोग आहेत. लिंबू उभे कापून त्यावर खडीसाखर घालून चोखल्यास ओकारी थांबते. पोटदुखी थांबण्यासाठी आले व लिंबाचा रस साखर घालून सेवन करतात. अजीर्णावर लिंबू फार उपयुक्त आहे. ते आडवे कापून त्यावर सुंठ किंवा सैंधव (मीठ) घालून निखाऱ्यावर गरम करतात आणि वारंवार चोखतात. त्यामुळे करपट ढेकर, ओकारी, पोटफुगी वगैरे त्रास कमी होतो. पित्त झाल्यास रोज लिंबाचा सरबत घेतात. त्याने भूक वाढते,अन्न पचते व शौचास साफ होते. अन्न खाण्याची इच्छा होत नसेत तर लिंबाची चतकोर फोड सालासकट खाल्ल्यास उपयोग होतो.

                                                                                                                      सागर भालेकर.

Comments

Post a Comment

Popular posts from this blog

आंब्याचे लोणचे

कोरोना विषाणू नागरिकांनी घरांमध्ये राहून कशा पद्दतीने सावधान राहिले पाहिजे.