कोरोना विषाणू नागरिकांनी घरांमध्ये राहून कशा पद्दतीने सावधान राहिले पाहिजे.

 कोरोना विषाणू नागरिकांनी घरांमध्ये राहून कशा पद्दतीने सावधान राहिले पाहिजे.

कोरोना विषाणूच्या दुसऱ्या लहरीमुळे देशाला पुन्हा एकदा विनाशाच्या मार्गावर उभे आणून ठेवले आहे. एक्स्पर्ट च्या माहितीनुसार जर तुम्हाला कोरोनाचे थोडे तरी संकेत दिसले तरी कृपया काही बाबतीत सावधानी बाळगा, जेणेकरून तुमच्यामुळे इतरांना त्रास होणार नाही.


ह्या लक्षणांना ओळखा - ताप (३७ डिग्री सेल्सियस पेक्षा जर जास्त तापमान असल्यास, सारखा खोकला असल्यास, तोंडाची चव आणि नाकाने वास घेता येत नसेल तर किंवा श्वास घेण्यामध्ये होणारी अडचण, थकणे, डोके दुखणे, घशामध्ये खवखवणे, छातीमध्ये दुखणे हे कोरोनाचे खूप सामान्य लक्षण आहे. अशी लक्षण तुमच्यामध्ये आढळून आल्यास ताबडतोब स्वतःला एका खोलीत बंद करा. आणि एक ऑनलाईन test बुक करा.


स्वतः एका खोलीत कसे राहाल: कोरोनाचे लक्षण दिसल्यास आपण स्वतः एका बंद खोलीत राहणेच एक अतिशय उत्तम उपाय आहे.  आपण आपल्या घरीच सुरक्षित राहू शकतो जोपर्यंत आपल्याला मेडिकल मदत मिळत नाही. कोणत्याही कारणास्तव बाहेर जाऊ नये. कोणत्याही कोरोना संक्रमित व्यक्तीच्या संपर्कात आल्यानंतरही हाच उपाय करावा.तुमचा सेल्फ आसोलेटेड मुदत कमीतकमी १४ दिवसांची आहे. ह्या काळात आपल्या घरच्याच्या संपर्कापासून दूर राहावे. आणि त्यांच्याशी social media तर्फे संपर्क साधावा.



कोणकोणत्या गोष्टीची दखलअंदाज घ्यावी: एखादी अशी जागा निवडावी की, त्या जागेच्या खिडकी उघड्या असाव्या त्यामुळे तुम्हाला बाहेरची हवाही मिळेल. शक्यतो औषध, किराणा माल पोहचवणारी माणसं घरी आल्यास तोंडाला रुमाल किंवा मास्क लावावे. घरच्या लोकांबरोबर साबण, टॉवेल,भांडी, पलंग अश्या कोणत्याही वस्तूची देवाण घेवाण करू नये. शिंका किंवा खोकला येत असल्यास तोंडावर मास्क लावावे किंवा हाताने तोंडावर हात ठेवावे आणि नंतर हात santizie करावे.


बाथरूमचा वापर कसा करावा: अश्या परिस्थितीत बाथरूमचा वापर करणे शक्यतो टाळावे. जर तुम्ही बाथरूम शेयर करत असाल तर ह्या गोष्टींकडे प्रामुख्याने लक्ष द्या. आपला टॉवेल, टूथब्रश आणि आपले मळके कपडे बाजूला काढून. बाथरूमचा वापर झाल्यानंतर ते कपडे धुवावे. लक्षात ठेवा, कोरोना संक्रमित झालेली व्यक्तीने अगदी शेवटी बाथरूमचा वापर करावा.


स्वयंपाक चा वापर कसा करावा:  स्वयंपाक घरात अन्य व्यक्ती असल्यास कोरोना संक्रमित व्यक्तीने तिथे जाऊ नये. शक्यतो, जेवणाची व्यवस्था कोरोनाने संक्रमित व्यक्तीच्या खोलीतच करावी. आपली भांडी आपल्याच खोलीत ठेवावी. भांडी गरम पाण्यामध्ये साबणाची पावडर टाकून धुवावी.

कशा पद्दतीने आपण आपली सुरक्षा ह्या फ्लू सारख्या व्हायरस पासून करावी. ह्यासाठी जास्तीत जास्त पाणी पियावे. पाणी पिल्याने तुमच्या लघवीचा रंग पिवळा येणार नाही. धूम्रपान किंवा दारू पियू नये. असं कोणतंही काम करू नये की ज्यामुळे तुमच्या लिव्हरला त्रास होईल. 



कधी डॉक्टरांशी संपर्क कराल: कोरोना व्हायरस चे अतिशगंभीर लक्षण दिसल्यास त्वरित डॉक्टरकडे तपासास जावे. कोणतेही औषध घेण्यापूर्वी डॉक्टरांची परवानगी घेतल्यशिवाय घेऊ नये.

                                                                                                 सागर भालेकर.


Comments

Popular posts from this blog

लिंबूचे फायदे

आंब्याचे लोणचे